A king was called mad for bowing to children but ignoring elders. He explained that adults have known achievements, while children hold unlimited potential—future poets, heroes, saints. Bowing honored their possibility, not their present. Wisdom lies in recognizing hidden greatness.
Note: This story is available in English, Hindi, Marathi, and Kannada.
Listen by Language
- Listen in Marathi (मुले म्हंजे देवाची ठेव)
- Listen in English
- Listen in Hindi (बच्चे ईश्वर स्वरूप)
- Listen in Kannada
Marathi: मुले म्हणजे देवाची ठेव | Mule Mhanje Devachi Thev
खालील कथा वाचा | Read This Story Below
मुले म्हणजे देवाची ठेवएक होता राजा. तो रस्त्याने जात असता वाटेत जर लहान मुले भेटली तर त्यांना नमस्कार करी. राजा म्हाताऱ्या लोकांना नमस्कार करीत नसे. परंतु मुलांसमोर मात्र लवे. लोकांना याचे आश्चर्य वाटे. हळूहळू लोक राजाला वेड लागले असे म्हणू लागले.
गोष्ट प्रधानाच्या कानावर गेली. त्याच्या मनात आले की, राजाला आपण सारे सांगावे. एके दिवशी तो मुद्दाम उजाडताच राजाला भेटावयास गेला. राजाने विचारले, “आज इतक्या लवकर काय काम आहे?” प्रधान म्हणाला, “महाराज मला तुम्हाला काही विचारावयाचे आहे.” राजा म्हणाला, “विचारा. संकोच करु नका.” प्रधान म्हणाला, “महाराज, तुम्ही वेडे झाले आहात असे सारे लोक म्हणतात.” राजा म्हणाला, “का बरे? मी कुणाच्या घरांना आगी लावित नाही. कोणाचे नुकसान करीत नाही. दुसरे देश लुटित नाही. प्रजेवर वाटेल तसे कर लादित नाही. मग मला वेडा का म्हणतात?”
प्रधान म्हणाला, “महाराज आपण दयाळू आहात, न्यायी आहात, सारे खरे. आपल्या कारकीर्दीत खेडोपाडी रस्ते झाले, विहिरी झाल्या, पाट झाले, उद्योगधंदे आहेत, सारे शिकलेले आहेत. न्याय आहे, नीती आहे. ते सारे खरे पण..” राजा म्हणाला, “पण काय? कोणती माझी चूक झाली, कोणते अविचाराचे कृत्य झाले?” प्रधान म्हणाला, “महाराज, तुम्ही रस्त्यातून जाताना शेंबड्या लहान पोरांना वाकून लवून नमस्कार करता. परंतु वृद्धांना कधी करीत नाही. नमस्कार करायचाच झाला तर म्हाताऱ्या मंडळीस करावा. लहान मुलांना का कोणी नमस्कार करतो?” राजाने हसून विचारले, “म्हणून का मी वेडा?” प्रधान म्हणाला, “लोक असे म्हणतात, राजा पोराबाळांना प्रणाम करतो. राजाला वेड लागले.”
राजाने उत्तर दिले, “मी वेडा नाही. लोकांनाच कळत नाही. मी करतो ते बरोबर करतो.” प्रधानाने विचारले, “ते कसे काय?” राजा म्हणाला, “जे लोक म्हातारे झाले, त्यांचा पराक्रम कळून चुकला. ते काय करणार, काय नाही, सारे जगाला कळले. त्यांची कर्तबगारी काय ती दिसून आली. परंतु लहान मुलांचे अद्याप सारे दिसावयाचे असते. लहान मुले पाहिली म्हणजे माझ्या मनात येते यांच्यातून उद्या कोण निर्माण होईल, कोणास ठाऊक? यांच्यातून मोठे कवी निघतात, चित्रकार निघतात, वीर निघतात, मुत्सद्दी निघतात, साधुसंत निघतात का मोठे शास्त्रज्ञ निघतात? काय सांगावे? सारे शक्य आहे. म्हणून मी मुलांना वंदन करतो. त्यांच्यातील अप्रकट शक्तीला नमस्कार करतो.”
प्रधान म्हणाला, “महाराज आपले करणे बरोबर आहे. आम्हीच वेडे. आपण शहाणे आहात, दूरचे बघणारे आहात.” राजा म्हणाला, “म्हणून तर लहान मुलांची काळजी घेतली जावी म्हणून मी खटपट करतो. त्यांच्यासाठी फुलबागा आहेत, त्यांच्यासाठी क्रीडांगणे आहेत. त्यांच्यासाठी नाना वस्तूंची संग्रहालये आहेत. शाळांतून त्यांना गायीचे दूध मिळेल अशी व्यवस्था केली. मुलांमधील देव प्रकट होतो. मुलांची जीवने नीट फुलून त्याचा सुगंध पसरो. मुले म्हणजे देवाची ठेव. हिला जपले पाहिजे.” प्रधान म्हणाला, “खरे आहे महाराज. आता लोकांना मी समजावून सांगेन. इतके दिवस बालदिन पाळतात परंतु मुलांचे महत्त्व त्यांना कळले नाही. मलाही कळले नाही.”
Read This Story in English
In a prosperous and peaceful kingdom, a thoughtful monarch ruled with great care for his people. One afternoon, while walking through the palace courtyard, the king encountered a gathering of elders and young children. Rather than performing the customary rites of welcoming the royal courtiers and senior citizens, the king hurried past the elders and bowed deeply before the young children. This strange reversal of court etiquette immediately caused confusion and surprise across the palace.Perplexed by the monarch’s conduct, the prime minister requested a private audience at dawn the following morning. When asked why he had disregarded the customary deference due to the elders of the kingdom, the king offered a considered explanation. He observed that the deeds, merits, and shortcomings of adults were already fixed and understood by the world. Their life stories had already been recorded, leaving little room for surprise or unwritten greatness.
Children, the king explained, embody the divine presence precisely because their potential remains boundless and uncharted. In every child rests the seed of a future poet, artist, warrior, statesman, philosopher, or scientist whose contributions have yet to shape the world. By bowing before the young, the monarch sought to honour that sacred, latent capability rather than mere past accomplishments, reminding his court that society’s deepest duty lies in nurturing the unwritten promise of tomorrow.
About This Story
This story was originally written in Marathi by Pandurang Sadashiv Sane, revered throughout Maharashtra as Sane Guruji. Celebrated for his sensitive portraits of human values and childhood innocence, Sane Guruji frequently used simple allegories to challenge entrenched social orthodoxies. This narrative inverts traditional courtly deference by examining how true reverence should be directed toward unformed potential rather than established status.
Sane Guruji’s Stories is a podcast produced by gaathastory (www.gaathastory.com) and narrated by Amar Vyas (www.amarvyas.in). Some content may be modified for brevity and context. English narration by Sheerali Biju, Hindi and Marahi Narration by Amar Vyas, translation in Kannada and Narration by Shruthi Prakash, Audio editing by Prashanth.